प्रश्न की समस्या.........
आता नवीन सुरवात
देशा पुढे अनेक प्रश्न आहेत
एकतर जीव वाचवयचा का अर्थव्यवस्था वाचवयायची .
कारण जीव वाचवायला गेलो तर जगण्यापूरते पैसे संपत आले आहे. आता रस्त्यावससर उतरण्याशिवाय पर्याय राहिला नाही. कारण घरात बसून कोण पैसा देत नाही. आणि नुसते गहू आणि तांदूळ खाऊन जगता येत नाही-ते फक्त बोलण्यापूरते. वास्तवात आतापर्यंत कोणी गहू आणि तांदूळ खाऊन आहे का? तुम्हाला (सरकारी नोकरदार आणि खाजगी कंपनी) पगार भेटतो म्हणून सहज बोलून जाता. पण खरंच आठवडा भर फक्त गहू तांदूळ खाऊन पहाच. रोजंदारीवर काम करण्याऱ्यांना (शेतकरी, मजूर )सुध्दा भावना आहेत. तुमची पोरे ऑनलाइन शिकू शकतात पण साधे मोबाईल फोन वापरणारे किंवा मोबाईल नसणाऱ्यांनी काय करायचे?का त्यांच्या मुलांनी फक्त आणि फक्त गुलामीच करायची का?अर्थव्यवस्थेसाठी दारू चालू ,कंपनी चालू, कंपनीत तुमचे पगार चालू .मग आमचे भाजी बंद, किराणा बंद, लहान मोठे व्यापार बंद ?असे का? कारण ती माणसे नाहीत का?
एकाला एक नियम दुसऱ्याला एक असे का?काय चालले आहे माझ्या देशात.सरकारी नोकरदारांचा पगारासाठी कर्ज घेणार आणि ते कर्ज कोण फेडणार सामान्य माणूस??? वा.!!!
खाजगी कंपनीत कामावर नाही तर पगार नाही आणि आहे त्यांचे ही शोषण.कसा चालणार हा गाडा?
कोण कोणासाठी काय करते हे महत्त्वाचे?
मला तर वाटते एक दिवस माणूस कोरोनानी नाही तर भूकबळीने मरेल.
नुसते जीव वाचावयचा म्हंटल्यावर आपला देश आफ्रिकन देशाच्या पंक्तीत बसेन.तेव्हा जीव असेल पण खायला अन्न आणि परिधान करायला कपडे नसतील.
एकतर आपल्या देशा पुढे लोकसंख्या हाच मोठा प्रॉब्लेम आहे. त्यात देशातील पगाराचे structure हे फार चुकीचे आहे. त्यासाठी एकतर साचेबद्ध पगार structure तयार करून ते सरकारी आणि खाजगी कंपनीत लागू केले पाहिजे. देशाचा ७० ते ८०% रक्कम जर पगारात जाणार असेल तर विकास करायचा कसा?
सरकारी कर्मचारी पगार घेऊन काम करत नसतील तर खाजगीकरणाची खरच गरज आहे. त्यात तर काय त्यांना पगार कमी पडतो की काय म्हणून ते भ्रष्टाचार करत सुटले?वा?देशाला धोका पाकिस्तान ,चीन चा नाही तर या भ्रष्टाचाराचा आहे. देशप्रेम फक्त चीनच्या वस्तूवर बहिष्कार टाकून नाहितर भ्रष्टाचार निर्मुलन करून होऊ शकते. प्रत्येकाने (माझे मित्र, कर्मचारी, अधिकारी,उद्योजक व इतर सर्व) प्रत्येकाला माणुसकीच्या नजरेने पाहणं गरजेचे आहे पैशाच्या नजरेने नाही.कोणी पैशांनी जरी लहान असला तरी माणुसकीने फार मोठा आसू शकतो ....आणि तोच खरा मोठा श्रीमंत माणूस .किती कमावले ह्या पेक्षा काय कमावले हे महत्वाचे. बोलायचे तर बरेच काही आहे पण किती बोललो तरी कमी म्हणून इथेच थांबतो .
तुमचा मित्र : सौरभ फुलसुंदर.
टिप्पण्या