पोस्ट्स

सौरभ फुलसुंदर........ लेबलसह पोस्ट दाखवत आहे

प्रश्न की समस्या.........

इमेज
आता नवीन सुरवात देशा पुढे अनेक प्रश्न आहेत एकतर जीव वाचवयचा का अर्थव्यवस्था वाचवयायची . कारण जीव वाचवायला गेलो तर जगण्यापूरते पैसे संपत आले आहे. आता रस्त्यावससर उतरण्याशिवाय पर्याय राहिला नाही. कारण  घरात बसून कोण पैसा देत नाही. आणि नुसते गहू आणि तांदूळ खाऊन जगता येत नाही-ते फक्त बोलण्यापूरते. वास्तवात आतापर्यंत कोणी गहू आणि तांदूळ खाऊन  आहे का? तुम्हाला (सरकारी नोकरदार आणि खाजगी कंपनी) पगार भेटतो म्हणून सहज बोलून जाता. पण खरंच आठवडा भर फक्त गहू तांदूळ खाऊन पहाच. रोजंदारीवर काम करण्याऱ्यांना (शेतकरी, मजूर )सुध्दा भावना आहेत. तुमची पोरे ऑनलाइन शिकू शकतात पण साधे मोबाईल फोन वापरणारे किंवा मोबाईल नसणाऱ्यांनी काय करायचे?का त्यांच्या मुलांनी फक्त आणि फक्त गुलामीच करायची का?अर्थव्यवस्थेसाठी दारू चालू ,कंपनी चालू, कंपनीत तुमचे पगार चालू .मग आमचे भाजी बंद, किराणा बंद, लहान मोठे व्यापार बंद ?असे का? कारण ती माणसे नाहीत का?  एकाला एक नियम दुसऱ्याला एक असे का?काय चालले आहे माझ्या देशात.सरकारी नोकरदारांचा पगारासाठी कर्ज घेणार आणि ते कर्ज कोण फेडणार सामान्य माणूस??? वा.!!!...