पुस्तकं आणि मी...... 😊
माझ्या आयुष्यात मी अनेक पुस्तके वाचली पण ज्यावेळी मोठे साहित्य वाचायला घेतलं .
त्यावेळी माझ्या गुरुवर्य यांनी माझ्या हातात पहिलं पुस्तकं दिलं ते म्हणजे. तराळ अंतराळ हे पुस्तकं ते पुस्तकं वाचून मी खरंच थक्क झालो माझ्या आयुष्यात मी किती सुखी आणि आनंदी आहे याचं उत्तर मला त्या पुस्तकात सापडलं .
गरीबीचा शेवट असणाऱ्या व्यक्तीने स्वतःच्या जिद्दवर आणि भारतरत्न डाँ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरत झालेले . स्वतःच्या आत्मचरिञातून जगाला दाखवून दिले की गरीबी माणसाच्या आड येत नाही तर आपण त्या ठिकाणी कमी पडतो. परिस्थिती कशी असो त्यावर मात करता आली पहिजे. पण नेहमी वाटतं की जी लोकं म्हणतात की माझं आयुष्य खुप वाईट चाललंय व जगतोय , माझ्या आयुष्यात खुप संघर्ष सुरू आहे . त्यांना मला सांगायचं आहे की बाबांनो . तुम्हाला जर वाटतं असले की आपली परिस्थिती खुप वाईट आहे तर एखादं तराळ अंतराळ पुस्तकं वाच कळेल तुला की तु सध्या तुझ्या जीवनात किती सुखी आहेस ते . अतिशय सामान्य माणूस पण शिक्षणाच्या बळावर हँलेकाँप्टर मधून फिरले .
माझ्या सारख्या असंख्य लोकांच्या मनावर ते आज राज्य करत आहेत . डाँ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आज लोक आणि तेथील प्राध्यापक व सर्वच म्हणतात की असा एवढा कर्तृत्वान कुलुगुरु मिळेल का?..... मला एकचं वाटतंय की सर आपल्या सारखे आत्मचरिञ पुन्हा कोणी लिहिले का? ...........
टिप्पण्या