काम, क्रोध, लोभ, मोह, मद
आणि मत्सर हे सहा दोष.....
यांनाच *षड्रिपु* म्हणतात.

फार्सी भाषेत यांना *ऐब* म्हणतात.
   हे *सहा ऐब* ज्याच्या अंगी
      ठासून भरलेले असतात
   त्याला *साहेब* म्हणतात.....

या सहा दोषांना सहज *धारण*
करणाऱ्यास *साधारण* म्हणतात....

या सहांना *मान्य* करणाऱ्यास
     *सामान्य* म्हणतात.....

या सहांना आपल्या *धाकात*
ठेवणाऱ्यास *साधक* म्हणतात....

या सहांना *अधू* करणाऱ्यास
       *साधू* म्हणतात.....

या सहांचा संपूर्ण *अंत* करणाऱ्यास
          *संत* म्हणतात.....

आणि या सहांचा *अर्थ* नीट समजून
घेऊन जो स्वतःची आत्मोन्नती करतो
      त्याला *समर्थ* म्हणतात.....

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जगात दोनच प्रकारची माणसं आनंदात असतात...!**वेडीे माणसं आणि लहान मुलं!*

अशी गुंतवणूक जी व्याजासकट नक्की परत मिळेल....

व्यवसाय म्हणजे गुंतवणूक हा समज चुकीचा आहे का?????