कोणाला प्रतिक्रिया..... द्याची.....??????

एका गाढवाला झाडाला बांधले होते.  एका रात्री एका भूताने दोरी कापून गाढवाला सोडले.

 गाढवाने जाऊन शेतातील पिके नष्ट केली. चिडलेल्या  शेतकर्‍याच्या बायकोने गाढवाला दगड घालून ठार केले.

 या गाढवाचा मालक नुकसानीमुळे उद्ध्वस्त झाला. प्रत्युत्तरादाखल त्याने  शेतकऱ्याच्या बायकोला दगड घालून ठार केले.

 पत्नीच्या मृत्यूमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्याने विळा घेऊन गाढवाच्या मालकाची हत्या केली.

 गाढवाच्या मालकाच्या पत्नीला  राग आला , तिने आणि तिच्या मुलांनी शेतकर्‍याच्या घराला आग लावली.

 शेतकर्‍याने आपले घराची राख बघून पुढे जाऊन त्या गाढवाच्या मालकाच्या बायकोला आणि मुलांना दोघांना ठार मारले.

 शेवटी, जेव्हा शेतकर्‍याला वाईट वाटले, तेव्हा तो त्या भुताला म्हणाला की, तुझ्यामुळे सगळे मेले.

*अस का केलंस ???*

 *त्या भूताने उत्तर दिले,*

 *"मी कुणाला ठार मारले नाही. मी नुसतेच दोरीने बांधलेले गाढव सोडले.*

*तात्पर्य.....*

 *आज माध्यम भूता सारखी झाली आहेत. ते दररोज गाढवे सोडत राहतात आणि लोक प्रतिक्रिया देतात आणि एकमेकांशी भांडतात, एकमेकांना दुखावतात, अगदी कसलाही विचार न करता.*

 *सरतेशेवटी, माध्यमांद्वारे सोडलेल्या प्रत्येक गाढवावर प्रतिक्रिया न ठेवण्याची आणि आपले मित्र आणि नातेवाईक यांच्याशी असलेले आपले संबंध जपण्याची आपली जबाबदारी आहे.*
*माध्यम (चॅनल) तमाशा घडवून आणतात आणि पैसा कमावतात.*

🙏🙏🙏🙏

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जगात दोनच प्रकारची माणसं आनंदात असतात...!**वेडीे माणसं आणि लहान मुलं!*

अशी गुंतवणूक जी व्याजासकट नक्की परत मिळेल....

व्यवसाय म्हणजे गुंतवणूक हा समज चुकीचा आहे का?????