बोलताना जरा सांभाळून.......
बोलताना जरा सांभाळून...........
शब्दाला तलवारी पेक्षा जास्त धार असते
फरक फक्त एवढाच की, तलवारीने मान तर
शब्दांनी मन कापले जाते
जरी तलवारीच्या जखमेतून स्वत:
आणि शब्दांच्या जखमेतून अश्रु
दोघांपासुन होणारी वेदना मात्र सारखीच असते
म्हणून म्हणते बोलताना जरा सांभाळून...........
शब्दाला तलवारी पेक्षा जास्त धार असते
शब्द माणसाला जोडतात आणि
शब्दच माणसाला तोडतात
हेच शब्द आहेत ते कधी रामायण
तर कधी कुराण तर कधी महाभारत रचतात
तुझ्या एका शब्दावर माझे हरणे
तर तूझ्या एका शब्दावर माझे रडणे अवलंबून आहे
म्हणुन म्हणते बोलताना जरा सांभाळून......
शब्दाला तलवारी पेक्षा जास्त धार असते
टिप्पण्या