एका गाढवाला झाडाला बांधले होते. एका रात्री एका भूताने दोरी कापून गाढवाला सोडले. गाढवाने जाऊन शेतातील पिके नष्ट केली. चिडलेल्या शेतकर्याच्या बायकोने गाढवाला दगड घालून ठार केले. या गाढवाचा मालक नुकसानीमुळे उद्ध्वस्त झाला. प्रत्युत्तरादाखल त्याने शेतकऱ्याच्या बायकोला दगड घालून ठार केले. पत्नीच्या मृत्यूमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्याने विळा घेऊन गाढवाच्या मालकाची हत्या केली. गाढवाच्या मालकाच्या पत्नीला राग आला , तिने आणि तिच्या मुलांनी शेतकर्याच्या घराला आग लावली. शेतकर्याने आपले घराची राख बघून पुढे जाऊन त्या गाढवाच्या मालकाच्या बायकोला आणि मुलांना दोघांना ठार मारले. शेवटी, जेव्हा शेतकर्याला वाईट वाटले, तेव्हा तो त्या भुताला म्हणाला की, तुझ्यामुळे सगळे मेले. *अस का केलंस ???* *त्या भूताने उत्तर दिले,* *"मी कुणाला ठार मारले नाही. मी नुसतेच दोरीने बांधलेले गाढव सोडले.* *तात्पर्य.....* *आज माध्यम भूता सारखी झाली आहेत. ते दररोज गाढवे सोडत राहतात आणि लोक प्रतिक्रिया देतात आणि एकमेकांशी भांडतात, एकमेकांना दुखावतात, अ...
आता नवीन सुरवात देशा पुढे अनेक प्रश्न आहेत एकतर जीव वाचवयचा का अर्थव्यवस्था वाचवयायची . कारण जीव वाचवायला गेलो तर जगण्यापूरते पैसे संपत आले आहे. आता रस्त्यावससर उतरण्याशिवाय पर्याय राहिला नाही. कारण घरात बसून कोण पैसा देत नाही. आणि नुसते गहू आणि तांदूळ खाऊन जगता येत नाही-ते फक्त बोलण्यापूरते. वास्तवात आतापर्यंत कोणी गहू आणि तांदूळ खाऊन आहे का? तुम्हाला (सरकारी नोकरदार आणि खाजगी कंपनी) पगार भेटतो म्हणून सहज बोलून जाता. पण खरंच आठवडा भर फक्त गहू तांदूळ खाऊन पहाच. रोजंदारीवर काम करण्याऱ्यांना (शेतकरी, मजूर )सुध्दा भावना आहेत. तुमची पोरे ऑनलाइन शिकू शकतात पण साधे मोबाईल फोन वापरणारे किंवा मोबाईल नसणाऱ्यांनी काय करायचे?का त्यांच्या मुलांनी फक्त आणि फक्त गुलामीच करायची का?अर्थव्यवस्थेसाठी दारू चालू ,कंपनी चालू, कंपनीत तुमचे पगार चालू .मग आमचे भाजी बंद, किराणा बंद, लहान मोठे व्यापार बंद ?असे का? कारण ती माणसे नाहीत का? एकाला एक नियम दुसऱ्याला एक असे का?काय चालले आहे माझ्या देशात.सरकारी नोकरदारांचा पगारासाठी कर्ज घेणार आणि ते कर्ज कोण फेडणार सामान्य माणूस??? वा.!!!...
टिप्पण्या