जीवनाचं मोल ......... 😊

                          ✍️  गुरु .. ✍️ 



'गु’ म्हणजे अज्ञानरूपी अंधकार आणि  ‘रु’ म्हणजे त्या अंधकाराचा नाश करणारे ज्ञानरूपी तेज; म्हणून गुरु म्हणजे अज्ञानरूपी अंधकार घालविणारा ..


जो  आपल्या सुखासाठी स्वतः दुःख सहन करतो तो खरा गुरु ....

जो  समाजात निर्भयपणे वागायला शिकवतो तो खरा गुरु ...

ज्ञानाला किंमत, जगण्याला हिम्मत व दानाला महत्त्व देणारा तो खरा गुरु ....

त्याग, समर्पण, राष्ट्रप्रेम, सत्यनिष्ठा,  प्रामाणिकता असे गुण स्वतः त आणून विद्यार्थ्यांत निर्माण करण्यासाठी प्रयन्त करणारा तो खरा गुरु ....

शिष्याचा योग्य हट्ट योग्य वेळी पुरविणारा तो खरा गुरु ...


        खर तर आतापर्यंत माझ्या जीवनात अनेक गुरु लाभले ...  त्यांनी फक्त लढायला नाही तर जगायला सुद्धा शिकवलं 😊.. 


म्हणून त्या गुरुसाठी एवढंच ...

हे माझ्या ईश्वरा वेगवेगळ्या रुपात तू मला दिसतोस ...
कधी आई , कधी बाप , तर कधी माझ्यातला मीच तू होतोस ..
माझ्या सुखादुःखात साथ तू देतोस ..
कधी माझ्यात तू तर कधी तुझ्यात मी स्वतःला पाहतो ...
कसे एकमेकांच्या प्रेमात आपण चिंब भिजतो ...😊😊😊😊

                        ✍️ सौरभ ✍️
                             
      नक्की भेट द्या                  





   

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जगात दोनच प्रकारची माणसं आनंदात असतात...!**वेडीे माणसं आणि लहान मुलं!*

अशी गुंतवणूक जी व्याजासकट नक्की परत मिळेल....

व्यवसाय म्हणजे गुंतवणूक हा समज चुकीचा आहे का?????