एका गाढवाला झाडाला बांधले होते. एका रात्री एका भूताने दोरी कापून गाढवाला सोडले. गाढवाने जाऊन शेतातील पिके नष्ट केली. चिडलेल्या शेतकर्याच्या बायकोने गाढवाला दगड घालून ठार केले. या गाढवाचा मालक नुकसानीमुळे उद्ध्वस्त झाला. प्रत्युत्तरादाखल त्याने शेतकऱ्याच्या बायकोला दगड घालून ठार केले. पत्नीच्या मृत्यूमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्याने विळा घेऊन गाढवाच्या मालकाची हत्या केली. गाढवाच्या मालकाच्या पत्नीला राग आला , तिने आणि तिच्या मुलांनी शेतकर्याच्या घराला आग लावली. शेतकर्याने आपले घराची राख बघून पुढे जाऊन त्या गाढवाच्या मालकाच्या बायकोला आणि मुलांना दोघांना ठार मारले. शेवटी, जेव्हा शेतकर्याला वाईट वाटले, तेव्हा तो त्या भुताला म्हणाला की, तुझ्यामुळे सगळे मेले. *अस का केलंस ???* *त्या भूताने उत्तर दिले,* *"मी कुणाला ठार मारले नाही. मी नुसतेच दोरीने बांधलेले गाढव सोडले.* *तात्पर्य.....* *आज माध्यम भूता सारखी झाली आहेत. ते दररोज गाढवे सोडत राहतात आणि लोक प्रतिक्रिया देतात आणि एकमेकांशी भांडतात, एकमेकांना दुखावतात, अ...
बोलताना जरा सांभाळून........... शब्दाला तलवारी पेक्षा जास्त धार असते फरक फक्त एवढाच की, तलवारीने मान तर शब्दांनी मन कापले जाते जरी तलवारीच्या जखमेतून स्वत: आणि शब्दांच्या जखमेतून अश्रु दोघांपासुन होणारी वेदना मात्र सारखीच असते म्हणून म्हणते बोलताना जरा सांभाळून........... शब्दाला तलवारी पेक्षा जास्त धार असते शब्द माणसाला जोडतात आणि शब्दच माणसाला तोडतात हेच शब्द आहेत ते कधी रामायण तर कधी कुराण तर कधी महाभारत रचतात तुझ्या एका शब्दावर माझे हरणे तर तूझ्या एका शब्दावर माझे रडणे अवलंबून आहे म्हणुन म्हणते बोलताना जरा सांभाळून...... शब्दाला तलवारी पेक्षा जास्त धार असते
टिप्पण्या